
2019 पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नवी हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यासाठी आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची तारिख देण्यात आली आहे.
देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना 1 एप्रिल 2019 पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केली आहे. एप्रिल २०१९ नंतर बाजारात येणाऱ्या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे. तसेच 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांनादेखील परिवहन विभागाने एचएसआरपी बंधनकारक केले आहे. त्यासाठी 15 ऑगस्ट 2025 ची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.

























































