शेअर बाजारात चढ-उतार

गुरुवारी शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. बीएसई सेन्सेक्स सकाळी 154 अंकानी वधारला होता. मात्र दुपारच्या सत्रात यात घसरण झाली. सेन्सेक्स 57 अंकांनी वधारून 80,597 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 11.95 अंकांची किरकोळ वाढ होऊन 24,600 अंकांवर बंद झाला. इन्पहसिस, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व, एसबीआय, मारुती सुझुकी, टायटनचे शेअर्स वाढले.