
‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा, त्रुटी नाहीत, असा दावा करणाऱ्या मोदी सरकार आणि त्यांच्या निवडणूक आयोगाचा अखेर सर्वोच्च न्यायालयात पर्दाफाश झाला आहे. हरयाणातील एका गावातील सरपंचपद निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. न्यायालयातच फेरमतमोजणी झाली आणि चक्क पराभूत उमेदवार विजयी झाला. दरम्यान, देशात पहिल्यांदाच ‘ईव्हीएम’चा भंडाफोड झाला असून, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे.
हरयाणातील पानिपत जिल्ह्यातील बुआना लाखू गावातील सरपंचपदाची निवडणूक २ नोव्हेंबर २०२३ रोजी झाली होती. त्यात कुलदीप सिंह यांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र, पराभूत उमेदवार मोहित कुमार यांनी मोठी न्यायालयीन लढाई दिली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले. ‘ईव्हीएम’मधील मतांची मोजणी न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात आली आणि निकाल फिरला. पराभूत उमेदवार मोहित कुमार विजयी झाले. ११ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निकाल दिला. मोहित कुमार यांना विजयी घोषित करून त्यांची तत्काळ सरपंचपदी नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्ह्यातील बुआना लाखू गावातील सरपंचपदाची निवडणूक २ नोव्हेंबर २०२३ रोजी झाली होती. त्यात कुलदीप सिंह यांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र, पराभूत उमेदवार मोहित कुमार यांनी मोठी न्यायालयीन लढाई दिली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले. ‘ईव्हीएम’मधील मतांची मोजणी न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात आली आणि निकाल फिरला. पराभूत उमेदवार मोहित कुमार विजयी झाले. ११ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निकाल दिला. मोहित कुमार यांना विजयी घोषित करून त्यांची तत्काळ सरपंचपदी नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.
हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती आणि सर्व बूथवरील ईव्हीएमच्या मतांची मोजणी
बुआना लाखू गावातील ६९ क्रमांकाच्या बूथवरील ‘ईव्हीएम’चा वाद होता. सहनिवडणूक अधिकाऱ्यांनी ७ मे २०२५ रोजी या बूथवरील ‘ईव्हीएम’ची मतमोजणी करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, हा आदेश पंजाब-हरयाणा हायकोर्टाने रद्द केला. त्यानंतर मोहित कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयात ३१ जुलैला हे प्रकरण सुनावणीसाठी आले असता सर्वच बूथवरील (क्रमांक ६५ ते ७०) ईव्हीएम आणि रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश दिले. ६ ऑगस्ट रोजी प्रशासकीय अधिकारी, दोन्ही बाजूचे प्रतिनिधी, वकील यांच्यासमोर मतमोजणी झाली. एकूण ३७३७ मते मोजली गेली. सर्वाधिक १०५१ मते याचिकाकर्ते मोहित कुमार यांना मिळाली, तर कुलदीप सिंह यांना १००० मते मिळाली. ५१ मतांनी मोहित कुमार हे विजयी झाले.
निवडणुकीच्या दिवशी काय घडले
सरपंचपदाच्या निवडणुकीत ७ उमेदवार होते. त्यातील कुलदीप सिंह आणि मोहित कुमार यांच्यात तगडी लढत होती. त्यात बूथ क्रमांक ६९ वर निवडणूक अधिकाऱ्याने चुकीने निकाल बदलला, असा दावा केला जात होता. मोहित कुमार यांना पडलेली मते कुलदीप सिंह यांच्या खात्यात जोडली. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांची ही चूक लक्षात येताच मतमोजणी पुन्हा झाली. मात्र, त्यात जिंकलेल्या उमेदवाराला पराभूत घोषित केले. दोन उमेदवारांच्या मतांमध्ये अदलाबदल केल्याने हा घोळ झाला होता. गावातील लोकांनी बूथवार मतांची मोजणी केली तेव्हा हा प्रकार लक्षात आला आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणले. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले.