
जालना येथे आंदोलन करणाऱ्या एका आंदोलकाने मंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेतल्यानंतर त्या आंदोलकाला घेऊन जात असताना पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी मागून धावत येत त्या आंदोलकाच्या कंबरेत लाथ घातली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलीस उपअधीक्षकांवर टीका होत आहे.
View this post on Instagram
पत्नीने परस्पर दुसरे लग्न केल्याच्या वैफल्यातून तसेच पोलिसांकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने गोपाळ चौधरी या तरुणाने स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या होत्या. त्यावेळी गोपाळ चौधरी व त्याच्या कुटुंबियांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर त्यांनी अंगावर रॉकेल देखील ओतून घेतले. त्यामुळे पोलिसांनी गोपाळ चौधरी व त्याच्या कुटुबियांना ताब्यात घेतले.