हे करून पहा- बदलत्या ऋतूत सर्दी – खोकल्याचा त्रास

अनेकदा बदलत्या ऋतूत सर्दी-खोकल्याचा त्रास होतो.  यावर  काही खास घरगुती उपचार करता येतील.  तुम्हाला खोकला होत असेल तर एका कपमध्ये एक चमचा मध घालून आल्याच्या रसाचे काही थेंब घाला. त्यात एक ते दोन चिमूटभर हळद घालून मिक्स करा. याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळेल.

मध घसादुखीपासून आराम देईल तर हळद रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करेल. या तीन गोष्टींचे मिश्रण बदलत्या हवामानामुळे होणारे आजार रोखण्यासाठी उत्पृष्ट आहे. जर तुम्हाला सर्दी, खोकला आणि घसादुखीचा त्रास होत असेल तर दिवसभरात कोमट पाणी प्यावे.