
मायदेशात होत असलेल्या आगामी महिला क्रिकेट विश्वचषकासाठी हिंदुस्थानचा महिला संघ जाहीर करण्यात आला. सलामीवीर शफाली वर्माला वगळण्यात आले आहे. मात्र वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरला संघात स्थान मिळवण्यात यश लाभले. जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्णधारपदी अनुभवी हरमनप्रीत कौरलाच कायम ठेवण्यात आले असून उपकर्णधार म्हणून स्मृती मानधनाची निवड करण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीही संघाची घोषणा करण्यात आली.
यंदाच्या वर्ल्ड कपचे यजमानपद हिंदुस्थानला लाभले आहे. यातील काही लढती कोलंबोलाही खेळविल्या जाणार आहेत. येत्या 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया या स्पर्धेची फायनल 2 नोव्हेंबरला रंगेल. या स्पर्धेचे सामने बंगळुरू, गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्टणम आणि कोलंबो या पाच शहरांमध्ये खेळविले जाणार आहेत. तब्बल 12 वर्षांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानात विश्वचषकाचे आयोजन होत आहे.
आठ संघांची दावेदारी
हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान हे आठ संघ विश्वविजेतेपदासाठी पुन्हा एकदा झुंजणार आहेत. सातवेळा जगज्जेता ठरलेला ऑस्ट्रेलियाचाच संघ यंदाही प्रबळ दावेदार मानला जात आहे. या संघाला रोखण्याची ताकद फक्त आणि फक्त हिंदुस्थानी संघातच आहे.
हिंदुस्थानी महिलांनाही जेतेपदाचे दावेदार मानले जात असून त्यांचा सलामीचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळेल आणि त्यानंतर पाकिस्तानशी भिडेल. मग 9 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका, 12 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया (विशाखापट्टणम), 19 ऑक्टोबरला इंग्लंड (इंदूर), 23 ऑक्टोबरला न्यूझीलंड (गुवाहाटी) आणि 26 ऑक्टोबरला बांगलादेश (बंगळुरू) यांच्याविरुद्ध सामने खेळणार आहे.
हिंदुस्थानचा विश्वचषक संघ
हरमनप्रीत काwर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (यष्टिरक्षक), क्रांती गौड, अमनजोत काwर, राधा यादव, श्री चरणी, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ
हरमनप्रीत काwर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (यष्टिरक्षक), क्रांती गौड, सायली सातघरे, राधा यादव, श्री चरणी, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), स्नेह राणा.



























































