
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली, मुंबईचा राजाच्या पदाधिकारी, गणेशभक्तांनी कर्जत येथील पळसदरी येथे वृक्षारोपण करून मुंबईकरांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. याशिवाय मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांसारख्या सामाजिक उपक्रमांचा जागरही मंडळाच्या वतीने वर्षभर करण्यात येणार आहे.
महारक्तदान शिबीर, मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, मोफत चष्मा वाटप शिबीर तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत, यंदाच्या शैक्षणिक वर्षातील मुलांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना, संगणक प्रशिक्षण केंद्र, अॅडव्हान्स एक्सेल एआय, फोटोग्राफी प्रशिक्षण यांसारखे अभ्यासक्रम असे अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांनी दिली. मुंबईचा राजा आर्ट फेस्टिव्हल हे गणेशोत्सवाचे मोठे आकर्षण असणार आहे.