
कोकणच्या कला-संस्पृतीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेलो आणि चतुरस्र अभिनेते दिलीप प्रभावळकरांच्या इरसाल अभिनयाने नटलेलो ‘दशावतार’ दिवाळीआधीच प्रदर्शित होताहा. कोकणातील समृद्ध निसर्गवैभव, गर्द देवराई, देवराईंचे राखणदार यांची गूढरम्यता ‘दशावतार’च्या निमित्ताने 12 सप्टेंबरपासून हा सिनेमा थिएटरमध्ये पाहता येणार आहे. दिग्गज कलाकार, दमदार कथा असल्याने चित्रपटाची उत्पंठा प्रचंड वाढली आहे.
दशावतारच्या निमित्ताने कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, तिथल्या प्रथा-परंपरा, दशावतारी नाटय़कला यांचा सुरेख मिलाफ अनुभवता येणार आहे. यामध्ये कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्राr आणि त्याच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट चित्रपटात पाहता येईल. मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचे नवे पर्व घेऊन येणाऱया ‘दशावतार’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून मीडियामध्ये जबरदस्त व्हायरल होत आहे.
‘आवशीचो घो’ गाणा गाजताहा!
कोकणी मातीचा गंध असलेले चित्रपटातील ‘आवशीचो घो’ गाणे सर्वत्र गाजत आहे. हे गाणे गुरू ठाकूरच्या लेखणीतून उतरले असून ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘दशावतार’मध्ये प्रेक्षकांना भावनिक आणि कलात्मक अशा विविध स्तरावर अनुभव मिळणार आहे. ‘आवशीचो घो’ हे गाणं या प्रवासातील एक भावपूर्ण वळण आहे. तर ओंकारस्वरूप याने ते गायले आहे. संगीत, शब्द आणि अभिनयाचे कमाल सादरीकरण यामुळे हे गाणे सर्वांनाच आपलेसे वाटणारे आहे.
दिग्गज कलाकार, तगडा अभिनय!
- या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत दिसणार असून तगडा अभिनय असणारे मराठीतील दिग्गज कलाकार महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय पेंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर भूमिका साकारणार आहेत.
- या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर, सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितीन सहस्रबुद्धे, मृणाल सहस्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांनी केली असून अजित भुरे सृजनात्मक निर्माते आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची ही निर्मिती आहे.