
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा ठरणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑनलाइन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली असून हे विधेयक 20 ऑगस्ट रोजी लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काही महिन्यांत तपास यंत्रणांनी ऑनलाइन बेटिंग अॅपप्रकरणी कारवाईचा बडगा उचलला, अनेक सेलिब्रिटींना चौकशीसाठी नोटिसा बजावल्या, अशावेळी ऑनलाइन गेमिंग विधेयक आणले जात आहे.