14 लाख एकरवरील पिके बाधित

राज्यात मोठय़ा प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे गेल्या तीन- चार दिवसात जवळपास 12 ते 14 लाख एकर जमिनीवरील पिके बाधित झाली आहेत. नांदेड जिह्यात अतिवृष्टीमुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे काही भागात अजूनही रेड ऍलर्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुंबईत काही भागात पाणी साचले होते, पण त्याचा निचरा करण्यात आला. मुंबईतील लोकल सेवा धीम्या गतीने का होईना, पण सुरू आहेत. शासकीय-खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली असून जिथे शक्य आहे तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकडय़ा सतर्क आहेत. धरणांच्या विसर्गाबाबत शेजारील राज्ये सहकार्य करत आहेत. जास्त चिंता हिप्परगीची असून तिथे विसर्ग सुरू केला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

मिठी नदीत वाहून जाणारा तरुण सुदैवाने बचावला!

मिठी नदी धोक्याच्या पातळीवर गेल्याने येथील 350 लोकांना तात्पुरत्या निवाऱयात हलविले आहे. मुंबईतील फिल्टर पाडा परिसरात मिठी नदीत एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या तरुणाला काही अंतरावर दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले.

नागोठण्याला दुसऱ्या दिवशीही पुराचा वेढा

अंबा नदी कोपली असून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागोठणे गावाला दुसऱया दिवशीही पुराचा वेढा पडला आहे. अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांनी रात्र अक्षरशः जागून काढली. बाजारपेठेत पाणीच पाणी झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दिव्यात 13 जणांची सुटका

दिवा परिसरातील संतोष नगर येथील नाईक नगर चाळीमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने 13 रहिवासी त्या पाण्यात अडकलेले होते. त्यांची ठाणे महापालिकेच्या शीळ अग्निशमनदलाच्या जवानांनी रात्री उशिरा सुटका केली आहे.

समृद्धी हायवेवर दरड कोसळली

कसारा गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज संध्याकाळी समृद्धी महामार्गावर भली मोठी दरड कोसळली. त्यामुळे इगतपुरी कसारा दरम्यानची वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती.

गडचिरोलीत 50 गाकांचा संपर्क तुटला

गडचिरोलीत पाकसाचा कहर सुरू असून 10 जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आल्लापल्ली राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून तालुक्यातील 50 हून अधिक गाकांचा संपर्क तुटला आहे.

किमानतळाकर बसला आग

मुंबई किमानतळाकर टी-1 येथे दुपारी अचानक इंडिगो किमान कंपनीच्या बसला आग लागली. आग लागली तेक्हा त्यात प्रकासी नक्हते. त्यामुळे अनर्थ टळला. आग काही केळातच आटोक्यात आली.