Konkan rain update: राजापूरातील पूर ओसरला

rajapur-flood-water-recedes-kodvali-arjuna-rivers-normalized-jagbudi-still-at-danger-level

राजापूर तालुक्यात कोदवली आणि अर्जुना नद्यांना आलेला पूर ओसरला आहे.जवाहर चौक ते गणेश घाट रस्त्यावर अद्याप पुराचे पाणी असल्याने वाहतूक ठप्प आहे.

खेड तालुक्यातील जगबुडी नदी अजूनही धोका पातळीवर वाहत आहे.वशिष्ठी नदी,शास्त्री नदी आणि काजळी नदीचा पूर ओसरला आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १३१.९१ मिमी पाऊस पडला.त्यामध्ये मंडणगड – 101.75 मिमी,खेड – 182.14 मिमी,दापोली – 139.71 मिमी,चिपळूण – 166.67 मिमी,गुहागर – 130.40 मिमी,संगमेश्वर – 138.91 मिमी,रत्नागिरी – 118.22 मिमी,लांजा – 97.80 मिमी,राजापूर – 111.62 मिमी पाऊस पडला.