शहांनी मांडलेल्या विधेयकामुळे एनडीएत उडाला गोंधळ, भाजपला नायडू – कुमारांचा पाठिंबा गमावण्याची भिती – संजय राऊत

पंतप्रधानांन मुख्यमंत्र्यांना अटक करण्याबाबतचे एक विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहां यांनी सादर केले. या विधेयकावरून लोकसभेत मोठा गोंधळ झाला. विरोधी खासदारांनी या विधेयकाची प्रत फाडून गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भिरकावल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

या विधेयकावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. मोदी सरकारने मांडलेल्या या विधेयकामुळे चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार यांच्यावर भितीचं सावट असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांनमुख्यमंत्र्यां च्या अटकेबाबत एक विधेयक आज मोदी शहा यांनी संसदेत मांडले. या विधेयकामुळे चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार हे सर्वात जास्त घाबरलेले आहेत. मोदी सरकारला देखील ते सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतील का? याची भिती वाटत आहे‘, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.