अमेरिकेकडून सहा हजार विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द

अमेरिकेने सहा हजार विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले आहेत. या विद्यार्थ्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असून काही विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत संपली होती. यातील काही विद्यार्थी गुह्यांमध्ये सहभागी होते, असा आरोप असून त्यांच्यावर हल्ला करणे, चोरी करणे आणि मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे, असा आरोप आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दहशतवादाशी जोडलेल्या 200 ते 300 विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द केल्याचेही अमेरिकन सरकारकडून सांगण्यात आले.