
ओपनएआयने चॅटजीपीटी गो प्लान हिंदुस्थानात लाँच केला आहे. या प्लानची किंमत प्रति महिना 399 रुपये ठेवली आहे. ओपनएआयसाठी चॅटजीपीटी हा दुसरा सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, क्रिएटर्स चॅटजीपीटीचा वापर करतात. हे युजर्स लार्ंनग, क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लिंग सॉल्विंगसह अनेक कामांसाठी याचा वापर करतात. चॅटजीपीटी गो सब्सक्रायबर्सला ओपनएआयचे सर्वात अत्याधुनिक मॉडल जीपीटी-5 मिळेल.