
हिंदुस्थानी हवाई दलाला 97 एलसीए मार्क 1ए लढाऊ विमाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी सरकारने 62 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला अखेर मंजुरी दिली आहे. ही लढाऊ विमाने मेक इन इंडियाअंतर्गत बनवण्याची संधी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एलसीए मार्क 1ए लढाऊ विमानांसाठी एचएएलला मिळणारी ही दुसरी ऑर्डर असेल. यापूर्वी सरकारने एचएएलला 83 विमाने बनवण्याची ऑर्डर दिली आहे.
एलसीए मार्क 1ए हे तेजस विमानाची अत्याधुनिक आवृत्ती आहे. त्यात एव्हियोनिक्स आणि रडार सिस्टम अपग्रेड केल्या आहेत. एलसीए मार्क-1ए मधील 65 टक्क्यांपेक्षा जास्त उपकरणे बनविली जातात. तेजसदेखील एचएएलने विकसित केले आहे. केंद्र सरकारने एचएएलला भारतीय हवाई दलासाठी 83 एलसीए मार्क-1ए तयार करण्यासाठी 46,898 कोटींचा ठेका दिला. कंपनीकडे 83 विमाने देण्यासाठी 2028 पर्यंतचा वेळ आहे. 97 विमानांच्या नवीन प्रकल्पामुळे हिंदुस्थानी हवाई दलाला त्यांच्या मिग-21 विमानांच्या ताफ्याची जागा घेण्यास मदत होईल. हिंदुस्थानी हवाई दलात 62 वर्षे सेवा दिल्यानंतर 19 सप्टेंबर रोजी मिग-21 लढाऊ विमान निवृत्त होतील. नव्या ऑर्डरनंतर वायुदलाकडे तेजस विमानांची एकूण संख्या 180 होईल. याआधी वायुदलाकडे 83 तेजस विमानांची ऑर्डर दिली होती. यासाठी 48 हजार कोटी रुपये मोजले होते. ही नवीन विमाने मिग-21 विमानांची जागा घेतील. तेजस मार्क 1ए तेजस विमानाचे आधुनिक रूप आहे. यात पॉवरफुल ऑक्टिव इलेक्ट्रॉनिकली स्कँड एअर रडार लावले यामुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य आणि ठिकाणांना ट्रक करून हल्ला करू शकते.