
पोलीस होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुण-तरुणींसाठी खूशखबर आहे. पोलीस शिपाई पदाच्या १५,६३१ जागांवर भरती करण्यासंदर्भातील शासन निर्णय आज गृह विभागाने जारी केला. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई – १२३९९, पोलीस शिपाई चालक – २३४, बॅण्ड्समन – २५, सशस्त्र पोलीस शिपाई – २३९३, कारागृह शिपाई – ५८० संवर्गातील ही रिक्त पदे आहेत. सन २०२२ आणि २०२३ मध्ये पोलीस शिपाई पदासाठी असलेली कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुण-तरुणींनाही या भरतीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. लेखी परीक्षा ओएमआर शिट्सवर घेण्यात येणार आहे. यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४५० रुपये तर मागास प्रवर्गासाठी ३५० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.