चंद्रभागेला महापूर; नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली, 300 कुटुंबाचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने, पुणे व सातारा जिल्ह्यातील धरणामधील अतिरिक्त पाणी भीमा नदीत सोडले जात आहे. सुमारे पावणे दोन लाख क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू असल्याने पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला महापूर आला आहे. नदीच्या पात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे, समाध्या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदी काठच्या 300 हून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. प्रांताधिकारी सचिन इथापे मुख्याधिकारी महेश रोकडे आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.