लग्नानंतर पती-पत्नी पूर्ण स्वातंत्र्याचा दावा करु शकत नाही

supreme court

पती-पत्नी विवाहबंधनात अडकले असताना पूर्ण स्वातंत्र्याचा दावा करू शकत नाहीत. लग्न म्हणजे पती-पत्नीने एकत्र नांदणे. त्यामुळे जोडीदाराशिवाय पूर्णपणे स्वतंत्र असल्याचा दावा पती किंवा पत्नी कोणीही करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका प्रकरणात दिला. जे जोडीदार विवाहानंतर एकमेकांवर विसंबून राहण्यास तसेच एकत्र नांदण्यास तयार नसतात, त्यांनी विवाहबंधनात अडकू नये, असे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले.

सिंगापूर येथे राहणारा पती आणि हैदराबाद येथे राहणारी पत्नी यांच्यातील वादाचे प्रकरण कोर्टात गेले. याप्रकरणी न्यायालयाने मुलांचे भविष्य महत्त्वाचे मानून निर्णय दिला. विवाह म्हणजे दोन आत्म्यांचे, दोन व्यक्तींचे एकत्र येणे. कोणताही पती किंवा पत्नी मला माझ्या जोडीदारापासून पूर्णपणे स्वतंत्र राहायचे आहे, असे म्हणू शकत नाही, अशी टिप्पणी कोर्टानी केली. तसेच खंडपीठाने मुलांबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.