
गुप्त माहितीच्या आधारे मेहकर पोलिसांनी गुरुवारी पहाटे समृद्धी महामार्गावर मुंबई कडे जाणारा गुटख्याचा आयशर ट्रक पकडून 65 लाख 70 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. मेहकर पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गुटखा बाबत गुप्त माहिती भेटल्यावर त्यांनी पथक तयार करून आज पहाटे अंदाजे चार च्या आसपास समृद्धी महामार्गावर अमरावती वरून मुंबई कडे गुटखा घेऊन जाणारे आयशर क्रमांक M H 17 B 0210 पकडून त्यातील अंदाजे 65 लाख 70 हजारांचा गुटखा व आयशर किंमत 12 लाख असा एकूण 77 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, उपनिरीक्षक संदीप मेंधने, सुरेश काळे, प्रभाकर शिवणकर, इब्राहिम परसुवाले, संजय पवार लक्ष्मण कटक शरद कापसे करीम शहा,शिवाजी चिन, श्रीकृष्ण गवई ,रमेश गरड,संदीप भोंदणे सह कर्मचारी पथकाने ही कारवाई केली आहे. ही कारवाई करताना अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गुलाबसिंग किर्ता वसावे सुद्धा पोलीस स्टेशनला हजर होते.