महाझूठी सरकारचे पाप उघडे पडले; दोन दिवसांच्या पावसाने केली पोलखोल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, खालापूर, भाईंदरमध्ये जीवघेणे खड्डे

राज्यातील इन्फ्रास्ट्रक्चर कसे तगडे आहे याची महाझूठी सरकारने तुफान जाहिरातबाजी केली. कंत्राटदारांनी रस्त्यांची कामे गुळगुळीत केल्याचे ढोलदेखील बडवले, पण दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने सरकारचे पाप उघडे पडले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, खालापूर, भाईंदरमध्ये जीवघेणे खड्डे पडले असून वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे.

रस्त्यांच्या कामाचे कोट्यवधी रुपये कोणाच्या घशात गेले, असा थेट सवाल प्रवाशांनी केला आहे. दोन दिवसांच्या पावसाने सरकारच्या थापेबाजीची पोलखोल झाली असून सुप्रीम कोर्टाने रस्त्यांवर खड्डे असतील तर टोलवसुली करू नका, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बजावले आहे. त्यानंतर सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इथे होते ‘चंद्रा’ची सैर

ठाणे – घोडबंदर रोड, ठाणे-नाशिक महामार्ग, माजिवडा परिसर, मुंब्रा बायपास, शिळफाटा. कल्याण – पलावा रोड, बदलापूर रोड, मुरबाड रोड, गोविंदवाडी.

डोंबिवली – गुप्ते रोड, महात्मा फुले रोड, सुभाष रोड, ९० फुटी रस्ता, गरीबाचा वाडा.

नवी मुंबई – एमआयडीसी, तुर्भे ब्रीज, ऐरोली.

पालघर – ढवळे हॉस्पिटल, गोठनपूर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, माहीम वळण नाका.

तलासरी पोलीस चौकीसमोर, उड्डाणपूल, मोहितेवाडीसमोर.

डहाणू धुंदलवाडी मोडगा व-उधवा मार्ग.

मोखाडा खोडाळा-विहिगाव मार्ग.

वसई विरार पूर्व, चांदीप रोड, भोयदा पाडा, सेंट्रलपार्क.

विक्रमगड पाटील पाडा, विक्रमगड-मनोर राष्ट्रीय महामार्ग.

मुंबई-गोवा महामार्ग – कोलाड,

माणगाव, इंदापूर बायपास, लोणेरे, पुई आणि खांब.

अलिबाग-वडखळ महामार्ग – वडखळ, धरमतर पूल, पेझारी, खंडाळे, वाडगाव, पिंपळभाट.

अलिबाग-रोहा मार्ग वेलवली खानाव, उसर, वावे, फणसापूर, चिंचोटी.