सायबर हल्ल्यासाठी एआय टूल्सचा वापर

जगभराच्या तुलनेत हिंदुस्थानात सर्वात जास्त सायबर हल्ले होत आहेत. स्वीस सायबर सुरक्षा कंपनी अ‍ॅक्रॉनिसच्या सायबरथ्रेट रिपोर्ट 2025 च्या माहितीनुसार, मे 2025 मध्ये 12.44 टक्के विंडोजला मेलवेअरचा फटका बसला. जूनमध्ये ही आकडेवारी वाढून 13.2 टक्क्यांपर्यंत पोहोचली. सायबर गुन्हेगार हल्ल्यासाठी आता एआय टूल्सचा वापर करत आहेत. यासाठी बनावट ई-मेल, इनवॉइस, डीपफेक स्कॅम तयार केले जात आहेत. या सर्वांना ओळखणे अत्यंत कठीण आहे, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.