
चीनचे व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकचे संकेतस्थळ तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा हिंदुस्थानात दिसू लागले आहे. त्यामुळे मोदींनी पाकिस्तानप्रमाणे चीनलाही पायघडय़ा घातल्याचे समोर आले आहे. यावरून काँग्रेसने मोदींवर तोफ डागली असून चीनी प्रेम देशप्रेमावर भारी पडल्याची टीका केली आहे.दरम्यान, कंपनीने मात्र, प्रतिक्रीया दिलेली नाही.
गलवान खोऱ्यातील संघर्षात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते. सुरुवातीला मोदींनी चीनला क्लीन चीट दिली. परंतु, नंतर हेडलाईनसाठी टिकटॉकवर बंदी घातली. आता चीनसोबत गळाभेटी सुरु केल्या असून चीनच्या दौऱ्यावरही जाणार आहेत. मध्येच टिकटॉकचे संकेतस्थळ सुरू झाले. याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे.
पाकिस्तानप्रमाणे चीनसोबतही मोदींचा सौदा
पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानशी युद्धबंदी केली. आता चीनसोबतही मोदी गलवान खोऱ्यातील शहिदांच्या बलिदानाचा सौदा करत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे. दरम्यान टिकटॉकचे संकेतस्थळ उघडल्यानंतर या सेवेसाठी तुमच्य अॅक्सेस नाही असो संदेश दिसत आहे. गुगल प्ले स्टोअरवर मात्र अॅप उघडत नसल्याचे चित्र आहे.