आहार-विहार – संतुलित थाळी, उत्तम आरोग्याचा मंत्र

>> वैष्णवी ठिगळे

आजच्या वेगवान जीवनशैलीत बरेच लोक संतुलित आहारह्ण घेण्याऐवजी झटपट उपाय शोधतात जसे की प्रोटीन पावडर, मल्टीव्हिटॅमिन्स किंवा सप्लिमेंट्स. मात्र हे सप्लिमेंट्स पूर्ण जेवणाची जागा घेऊ शकत नाहीत. संतुलित थाळी हीच शरीरासाठी सर्वाधिक नैसर्गिक, सुरक्षित आणि परिणामकारक पद्धत आहे.

संतुलित थाळी म्हणजे काय?

संतुलित थाळी म्हणजे एका जेवणात सर्व प्रमुख पोषक घटक योग्य प्रमाणात असणे. यात प्रामुख्याने अर्धा भाग भाज्या (हिरव्या पालेभाज्या + रंगीत भाज्या), 1/4 भाग धान्ये / मिलेट्स / ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ (जास्त प्रमाणात सत्व), 1/4 भाग प्रथिन स्रोत (डाळी, कडधान्ये, अंडी, मासे, दूध पदार्थ), थोडी मात्रा आरोग्यदायी चरबी (शेंगदाणे, बदाम, तीळ, ऑलिव्ह ऑइल, तूप), सोबत 1 ग्लास पाणी / ताक / सूप आणि फळे दिवसातून किमान 1 ते 2 वेळेस हे इतक्या प्रमाणात असलेच पाहिजे.

शरीराचे पोषण भरून काढण्यासाठी सप्लिमेंट्सचाही उपयोग केला जातो परंतु तो मर्यादित असायला हवा. सप्लिमेंट्स म्हणजे एखाद्या विशिष्ट पोषकतत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी घेतलेली गोळी, पावडर किंवा लिक्विड स्वरूपात घेतले जाते. सप्लिमेंट्स केवळ डॉक्टरी सल्ल्याने कमतरतेनुसार घेतले गेले पाहिजेत. अन्नपदार्थांशिवाय इतर कशाचीही शरीराला गरज भासू नये याकरिता आहार संतूलित असणे आवश्यक आहे. संतुलित थाळी ही सर्व पोषकतत्वांचा नैसर्गिक आणि टिकाऊ स्रोत आहे. एल्ज्ज्तसहे हे केवळ वैद्यकीय सल्ल्याने, तात्पुरती कमतरता भरून काढण्यासाठीच घ्यावेत. रोजच्या आयुष्यात अन्नातून पोषण मिळवणे हेच दीर्घकालीन आरोग्याचे गुपित आहे.    z