बोगस काॅल सेंटरचा पर्दाफाश

अमेरिकेसह वेगवेगळय़ा देशातील नागरिकांची शेकडो कोटींची फसवणूक करणाऱ्या बोगस काॅल सेंटरचा ईडीने पर्दाफाश केला. गुरुग्राम आणि नवी दिल्लीत ही कारवाई केली. मागील 2 ते 3 वर्षांपासून अमेरिकी नागरिकांचे 130 कोटींपेक्षा जास्त रुपये लाटल्याची माहिती तपासात पुढे आली.