आटपाडी बाजार समितीत डाळिंबाची विक्रमी आवक

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भगव्या जातीच्या डाळिंबाची विक्रमी तब्बल 25 टन आवक नोंदवली गेली. यामधून बाजार समितीला सेसच्या माध्यमातून 1 लाख 14 हजारांचा महसूल मिळाला, तर शासन महसूलही 11,403 रुपये इतका झाला.

आटपाडी बाजार समितीत शुक्रवारी भगव्या डाळिंबाची 12 हजार 454 क्रेट्सची आवक झाली. तर, डाळिंबाला 10 रुपये ते 551 रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला. तसेच गणेश डाळिंबाच्या 14 क्रेट्सची आवक झाली. याला 10 रुपये ते 35 रुपये प्रतिकिलो दर मिळाला. आटपाडी बाजार समितीतील आधुनिक पॅकिंग सेंटर, व्यापाऱ्यांसाठी अनुकूल सुविधा, यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

आटपाडी बाजार समितीने राज्यातील बाजार समित्यांमध्ये 22वा क्रमांक आणि कोल्हापूर विभागात अव्वलस्थान पटकावले आहे. सभापती संतोष पुजारी, उपसभापती सुनील सरक, सचिव शशिकांत जाधव आणि संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीची झपाटय़ाने प्रगती होत आहे.

बाजार समितीत झालेली आवक व दर प्रती किलोतः डाळिंब (भगवा) – 12 हजार 454 क्रेट. दर 10 ते 551 रुपये. गणेश डाळिंब ः 14 क्रेट. दर 10 ते 35 रुपये. पेरू ः 76 क्रेट. दर 7 ते 18 रुपये ड्रगन फ्रूट ः 1 क्रेट. दर 52 रुपये.