
गणपतीच्या आगमनामुळे घरात खाण्यापिण्याची चंगळ असते. अशावेळी नेहमीचे तेच ते मोदक करण्यापेक्षा थोडाफार वेगळा प्रयोग किंवा वेगळा मोदकांचा प्रकार करुन बघायला हरकत नसते. अशावेळी शाही मोदक हा एक उत्तम पर्याय आहे. शाही मोदक करण्यासाठी फार वेळही लागत नाही. त्यामुळे घरबसल्या अगदी आरामात कुठलीही उकड न काढता शाही मोदक करता येतात. होतातही झटपट त्यामुळे वेळही वाया जात नाही.
गणपती बाप्पा मोरया 2025- मऊ लुसलुशीत मोदक करण्यासाठी कोणता तांदूळ सर्वात उत्तम, वाचा
शाही मोदक करण्याची कृती
साहित्य –
सारण करण्यासाठी
बारीक चिरलेले बदाम, पिस्ता
१ टेबलस्पून गुलकंद / गुलाबाच्या पाकळ्यांचा जाम
मोदकांसाठी –
१ टेबलस्पून दूध
१ कप सुका नारळ
१ टीस्पून तूप
१/२ कप गोड कंडेन्स्ड मिल्क
वेलची पावडर
खाण्याचा रंग – पिवळा
गणपती बाप्पा मोरया 2025- बाप्पाच्या नैवेद्यासाठी साधे सोपे न फुटणारे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक
कृती – सर्वात आधी एका भांड्यात सुका मेवा घ्यावा. त्यामध्ये गुलकंद घालावा, हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
मध्यम आचेवर पॅन गरम करुन त्यामध्ये, तूप, गोड कंडेन्स्ड दूध घालावे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे. किमान मिनिटभर शिजू द्यावे. त्यात सुका नारळ घालून व्यवस्थित मिक्स करावे. फूड कलर घालून शिजवून घ्यावे. घट्ट होईपर्यंत हे मिश्रण ढवळत राहावे. त्यानंत गॅस बंद करावा. गॅस बंद केल्यानंतर थोडे थंड झाल्यावर यामध्ये वेलची पावडर घालावी. हे सर्व मिश्रण व्यवस्थित थंड झाल्यावर, मोदकाच्या साच्यात हे मिश्रण भरावे. स्टफिंग साठी जागा सोडून त्यात आपण सर्वात सुरुवातीला केलेले ड्रायफ्रूट स्टफिंग भरावे. साचा बंद करावा आणि अधिकचे मिश्रण काढून टाकावे. त्यानंतर साचा उघडून तयार शाही मोदक बाहेर काढावा.