
Ganesh Chaturthi 2025 – गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाचे आगमन झाले आहे. देशभरात सर्व राज्यांमध्ये गणेश चतुर्थी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. 27 आॅगस्टला घरगुती बाप्पांचे आगमन मोठ्या थाटामाटात झालेले आहे. तसेच सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाच्या मूर्तीही आता विराजमान होण्याच्या तयारीमध्ये आहेत. घरगुती गणपतीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तीभावाने होण्यास सुरुवात झालेली आहे.
अवघ्या देशभरामध्ये गणेश उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी मखर, आरास सजले असून, मोठ्या भक्तीभावाने गणरायाचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे.
मुंबईसह पुण्यातील रस्त्यांवर बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुका दिसू लागल्या आहेत. तसेच ढोल ताशांच्या गजरामध्ये गणरायाचे स्वागत केले जात आहे. जंगी सुरु असलेल्या मिरवणुकांमधून बाप्पांच्या आगमनाची ग्वाही दिली जात आहे. त्यासोबतच गणपती बाप्पा मोरयाचा जयजयकार सर्वठिकाणी दुमदुमत आहे.
गणेश उत्सवातील काही महत्त्वाचे दिवस
27 ऑगस्ट 2025- गणेश चतुर्थी या दिवशी पहाटे 4:50 ते दुपारी 1:53 पर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.
31 ऑगस्ट 2025 : गौरी आवाहन अनुराधा नक्षत्रावर सूर्योदयापासून सायंकाळी 5.27 पर्यंत आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.
1 सप्टेंबर 2025 : गौरी पूजन
2 सप्टेंबर 2025 : गौरी विसर्जन मूळ नक्षत्रावर सूर्योदयापासून रात्री 9:51 पर्यंत गौरी विसर्जन करावे.
6 सप्टेंबर 2025 : अनंत चतुर्दशी