ट्रम्प यांनी 24 तासांत युद्धविराम करण्यास सांगितलं, मोदींनी मात्र 5 तासांतच केलं – राहुल गांधी

आज बिहारमधील मुझफ्फरपूर येथे मतदार हक्क यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ऑपरेशन सिंदूरवरील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा संदर्भ देत राहुल म्हणाले की, “ट्रम्प म्हणाले की त्यांनी नरेंद्र मोदींना फोन करून २४ तासांच्या आत ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले. पण २४ तास विसरून जा, नरेंद्र मोदींनी ५ तासांच्या आत युद्धविरामाची घोषणा केली. याचा अर्थ नरेंद्र मोदी भित्रे आहेत. मी लोकसभेत नरेंद्र मोदींना सांगितले की, तुम्ही म्हणा की ट्रम्प खोटे बोलत आहेत, पण त्यांच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही.”

भाजपवर हल्लाबोल करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, “संविधानात असे लिहिले आहे की, प्रत्येक नागरिकाला एक मत देण्याचा अधिकार आहे. श्रीमंत असो वा गरीब, सर्वांना एक मत मिळेल. पण महादेवपुरामध्ये एका व्यक्तीला ४ मतांचा अधिकार दिला जात आहे. भाजप अशा प्रकारे मतांची चोरी करून संविधानावर हल्ला करत आहे. कारण त्यांना दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांचा आवाज ऐकू येऊ नये, असे वाटते.”