
रेणापूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन दारे उघडण्यात आली असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
रेणापूर मध्यप्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज सकाळी ठीक 8.15 वाजता रेणापूर प्रकल्पाचे2 द्वार उघडण्यात आले आहेत. रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत एकूण 2 वक्र द्वारे 10 सेंटिमीटरने उघडण्यात आली असून एकूण 629.22 क्यूसेक्स (17.82क्यूमेक्स ) इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे, कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे . नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
रेणापूर मध्यम प्रकल्पाची दोन दारं उघडली, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा #RAIN #rainupdate pic.twitter.com/BCwAXxzQQo
— Saamana Online (@SaamanaOnline) August 28, 2025