टोमॅटोचा उपयोग करून काळी वर्तुळे घालवा, वाचा

सतत टीव्ही किंवा संगणकावर बसून आपल्या डोळ्यांवर ताण येणे साहाजिकच आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला अगदी लहान मुलांनाही चष्मा असलेला आपण बघतो. डोळ्यांचे आरोग्य जपणे हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या डोळ्यावर ताण येतो तेव्हा डोळ्यांतून पाणी येणे तसेच डोळे चुरचुरणे सुरू होते. या कारणांमुळे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतोत. यालाच डार्क सर्कल असेही म्हणतात. डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा अतिशय नाजूक असते. ही काळी वर्तुळे कमी करण्यासाठी घरगुती साधे सोपे कोणते उपाय आहेत हे आपण पाहणार आहोत. तसेच या उपयांमुळे आपल्या डोळ्यालाही कोणती इजा होणार नाही.

मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी वाचा आयुर्वेदातील महत्त्वाच्या टिप्स

काळी वर्तुळे घालवण्यासाठी टोमॅटोचा वापर आपण करू शकतो. टोमॅटो त्वचेचा रंग स्वच्छ करण्यासाठी एक चांगला नैसर्गिक ब्लीचिंग स्त्रोत्र आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन-सी, अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-एजिंग गुणधर्म डोळ्याखालील काळ्या डांगावरर तसेच वर्तुळांवर प्रभावी आहेत. टोमॅटोमध्ये असलेल्या लाइकोपीनमुळे सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत होते. टोमॅटोच्या चकत्या आपण नियमितपणे 15 दिवस डोळ्यांवर ठेवल्या तर काळ्या सर्कलपासून आपली नक्कीच मुक्तता होईल.

निरोगी राहायचंय का? मग या कडू गोष्टी खा!

टोमॅटो आणि बटाटा भाजी आपण खाल्ली आहे. परंतु टोमॅटो आणि बटाटे एकत्रितपणे भाजीसाठीच नाही तर, काळ्या सर्कलपासूनही आपली मुक्तता करतात. याकरता टोमॅटो मॅश करून बटाटे एकत्र करा. आता या दोघांना मिसळून पेस्ट तयार करा आणि डोळ्याखाली असलेल्या काळ्या वर्तुळांवर अर्धा तास लावुन ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

टोमॅटो आणि लिंबू यांचा वापर करून आपण डार्क सर्कल घालवु शकतो. याकरता टोमॅटो आणि लिंबाचा रस चांगला नीट मिसळुन घ्या. त्यानंतर डोळ्यांखालील भागाला हलक्या हातांनी 15 मिनिटांसाठी मालिश करा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा