Maratha Reservation – आझाद मैदानावरील जरांगेंच्या आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? वाचा…

मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. सकाळी १० वाजल्यापासून जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलिसांकडून अटी-शर्तींसह ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली.

मराठी माणूस न्याय हक्कांसाठी मुंबईत येणार नाही, तर काय सूरत, गुवाहाटीला जाणार? उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल

आज सकाळी आंदोलक आलेले आहेत. मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे. आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. शासनाचीही भूमिका सहकार्याची आहे. कारण लोकशाही पद्धतीने एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही. लोकशाहीतून चर्चेतनं प्रश्न सोडवायचे असतात. आंदोलन त्याचा एक मार्ग असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते आम्ही करतोय. उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिलेत त्या आदेशानुसार सगळं सहकार्य चाललं आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

जातीजातीत भांडणे लावत महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत; संजय राऊत यांचा घणाघात

मुंबईत तुरळक प्रमाणात काही ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको केला, वाहतूक विस्कळीत केली. पण पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही ठिकाणी आंदोलकांनी सहकार्य केलेलं आहे. आणि त्या-त्या जागा मोकळ्या केलेल्या आहेत. अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर वाहतूक विस्कळीत होते, ती विस्कळीत झालेली आहे. अर्थात एका गोष्टीची खबरदारी घ्यावी लागेल की, काही लोकच वेगळ्या पद्धतीने वागतात. आणि त्याने मग संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं तर अशाप्रकारे कोणीही वागू नये. मनोज जरांगे पाटील यांनीही आवाहन केलेलं आहे की, कोणीही अलोकतांत्रिक पद्धतीने किंवा आडमुठेपणाने वागू नये, असे आवाहन केले आहे. आम्ही आंदोलकांना तेच आवाहन करतोय, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.