
अभिनेता मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेला ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट उद्यापासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. यात सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या अटकेचा थरार दाखवला आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयी यांच्यासह भाऊ कदम, सचिन खेडेकर, गिरीजा ओक, जिम सर्भ, वैभव मांगले यांच्या भूमिका आहेत.