बाप्पासाठी ऑनलाइन मोदकांना पसंती

गणेशोत्सवात यंदा बाप्पासाठी ऑनलाइन मोदक ऑर्डर करण्याला सर्वाधिक पसंती असल्याचे दिसतेय. गणेशोत्सवाच्या काळात स्विगीवर तब्बल 2,28,102 मोदकांची ऑर्डर दिली. मोदकाची ऑर्डर करण्यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर होता. खासकरून मुंबई, पुणेकरांनी सर्वाधिक मोदकांची ऑर्डर दिली. मुंबईने 69,240 तर पुण्याने 30,433 मोदकांची ऑर्डर केली. त्यानंतर नागपूर, नाशिक आणि अमरावतीचा क्रमांक लागतो. स्विगीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या तुलनेत यंदा स्विगीच्या ऑर्डर्समध्ये 35 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ग्राहकांनी सर्वाधिक पसंती मावा मोदकाला दिली. महाराष्ट्रात उकडीच्या मोदकांची 4460 ऑर्डर मिळाल्यामुळे परंपरेचे महत्त्व दिसून आले.