
हिमाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी आणि जीवितहानी झाली असून तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा सफरचंद उद्योग संकटात सापडला आहे. राज्यात तीन राष्ट्रीय महामार्गांसह 1100 हून अधिक रस्ते भूस्खलनामुळे बंद आहेत. त्यामुळे सफरचंद बाजारपेठेत पोहोचवणे मोठे जिकिरीचे बनले आहे.
बागायतदारांचे हजारो पेटी सफरचंद गोदामात पडून सडू लागले आहेत. मोठय़ा प्रमाणावर सफरचंदाच्या पेटय़ा ट्रक किंवा पिकअप टेम्पोत लोड करून ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून रस्ते खुले झाल्यानंतर तत्काळ सर्व पेटय़ा बाजारपेठेत पोहोचवता येतील, परंतु पाऊस सुरूच असून अनेक भागांत भूस्खलनाच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी 10 ते 15 दिवस
सफरचंदाच्या पेटय़ा ट्रक किंवा टेम्पोत, पिकअप वाहनांत लोड करून ठेवण्यात आल्या आहेत. रस्ते खुले होण्यासाठी आणखी 10 ते 15 दिवस लागू शकतात. त्यामुळे हे सफरचंद सुस्थितीत ठेवण्याचे फळबागांच्या मालकांसमोर मोठे आव्हान आहे. किनौरच्या टापरी मंडईत तब्बल 15 हजार पेटी सफरचंद ऑक्शन यार्ड आणि उभ्या असलेल्या वाहनांमध्ये पडून आहेत. मंडी, कुल्लू आणि चंबा येथे विविध भागांत 55 हजार पेटय़ा सफरचंद पडून आहेत.
बडोदा बीएनपी परिबा समूहात गुंतवणुकीची संधी
बडोदा बीएनपी परिबा सामान्य गुंतवणूकदारांना बडय़ा उद्योगसमूहात गुंतवणुकीसाठी बिझनेस काँग्लोमेरेट्स फंड सादर करत आहे. हा फंड हिंदुस्थानातील व्यावसायिक समूहातील पंपन्यांवर लक्ष केंद्रित करून प्रतिष्ठत उद्योगसमूहात गुंतवणूक करण्यासाठी तयार केलेला आहे. नवीन फंड ऑफर येत्या 2 सप्टेंबर 2025 रोजी गुंतवणुकीसाठी खुली झाली असून 15 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. गुंतवणूकदार दरमहा केवळ 500 रुपये गुंतवणुकीने सुरुवात करू शकतील, अशी माहिती व्यवस्थापक वरिष्ठ निधी व्यवस्थापक जितेंद्र श्रीराम यांनी सांगितले.
वॉलप्लास्टचे नोव्हा 125 बाजारात
वॉलप्लास्ट प्रोडक्टस् प्रायव्हेट लिमिटेडने प्रीमियम जिप्सम प्लॅस्टरची नवी श्रेणी आणली असून नोव्हा 125 बाजारात उपलब्ध करून दिले आहे. हे प्लॅस्टर उत्तम दर्जाचे असून जलद काम आणि उत्कृष्ट फिनिशिंगसाठी बनवले आहे. हे उत्पादन नवीन तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाच्या कच्च्या मालापासून तयार करण्यात आल्याचे
वॉलप्लास्टचे व्यवस्थापकीय संचालक काwशल मेहता यांनी सांगितले.
बीग बेलचे रोल ऑन परफ्युम बाजारात
बीग बेल कंपनीने उत्तम दर्जाचे मनाला तजेला देणारे रोल ऑन परफ्युम बाजारात आणले आहेत. हे परफ्युम पूजेसाठीही वापरता येतील. बॉस लेडी, ब्लसम, ब्लॅक ब्युटी, रॉयल चंदन अत्त्यांतर रोल ऑन बेल अशी एकापेक्षा एक सुगंधी परफ्युम बाजारात आणली आहेत. बाप्पाच्या दरबारातही या परफ्युमचा दरवळ मनाला समाधान देईल आणि भक्तिभाव निर्माण होईल. हे परफ्युम www.bigbelincense.com या संकेतस्थळावरून ऑर्डर करता येतील.
रिलायन्स जिओचे ग्राहक वाढले
हिंदुस्थानातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या 500 मिलियन म्हणजेच 50 कोटींहून अधिक झाल्याची घोषणा पंपनीने केली आहे. अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि फ्रान्सच्या एकूण लोकसंख्येच्या म्हणजेच 48 कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे जिओ आता जगातील सर्वात मोठे मोबाइल नेटवर्क बनले आहे.
महाराजाची मिस्टिक ऊद वुड, हिमालय कस्तुरी बाजारात
महाराजा अगरबत्तीने ऊद वुड आणि हिमालय कस्तुरी प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आणली आहे. ही अगरबत्ती 50, 100 आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. महाराजा अगरबत्तीच्या वास्तुयंत्र आणि हरी पानडी, गुरुदेव चंदन आणि रुद्राक्ष, व्हाईट सेज आणि विरा, प्युअर हिना आणि गोल्डन पेटल्स, प्रार्थना, मिस्टिक मस्क, मिस्टिक रोझ, टेंपल ब्लिस, रॉयल ऊद, हिना, पानडी, सुखद सँडल, कॉन्फिटंड, कस्तुरी, ड्रीम, लव्हेंडर, सँडलवुड, ग्रीन मस्क, अनमोल, केसरिया ऊद, स्वामी, ग्रीन मस्क आणि अंगारे ऊद अशा अनेक उत्तम सुगंधी अगरबत्त्या दुकानांमध्ये तसेच महाराजा अगरबत्ती, रघुनाथ निवास, शिवाजी पार्क रोड, दादर (पश्चिम) येथे उपलब्ध आहेत.