दोन दशके झाली… शहरातील वाहतूक नियमांचे फलक गायब!

छत्रपती संभाजीनगर शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाल्यापासून शहर स्मार्ट करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र या शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचे असलेले वाहतूक नियमांचे फलक लावण्यासाठी कुठलीच हालचाल झाली झाली नाही. दोन दशकापासून शहरातील वाहतूक नियमांचे फलक गायब झाले आहेत. फलक नसल्याने कुठल्या रस्त्यावर प्रवेश निषिद्ध आहे किंवा कुठे वाहन थांबविण्यास मनाई आहे, याची माहिती वाहनधारकांना मिळत नाही. विशेषकरून बाहेरगावाहून आलेल्या वाहनधारकांची चांगलीच पंचाईत होत आहे.

ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या या शहराला राज्याच्या पर्यटनाची राजधानी म्हणून घोषीत केले आहे. त्यापाठोपाठ केंद्र सरकारच्या योजनेत या शहरला स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ऐतिहासिक शहर आणि पर्यटनाची राजधानीचा लौकिक म्हणून शहराला वेगळेपण मिळाले नाही. दरम्यान, स्मार्टसिटी योजनेतून मिळालेल्या लाखो रुपयांच्या निधीतून शहरातील खड्डेमय रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला. बहुतांश रस्ते सिमेंटचे झाले असल्याने वाहतूक सुसाट झाली, मात्र या वाहतुकीवर कुणाचेच नियंत्रण नसल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. सर्वच रस्त्यावर वाहतूक जामचे चित्र आहे.

बेशिस्त वाहनधारकांनी शहराच्या वाहतुकीस वेठीस धरले आहे. दुसरीकडे वाहतूक शाखेकडून होणारी कारवाई तोंड देखलेपणाची आहे. विशेष म्हणजे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आवश्यक असलेले वाहतूक नियमांचे फलकच नसल्याने बोलणार कुणाला, असा प्रश्न आहे. प्रवेश निषिद्ध, उजवीकडे किंवा डावीकडे वळू नये, हॉर्न

ना वाहतूक शाखेला घेणदेणे, महाका सोयरसुतक शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा
वाजविण्यास मनाई, गती मर्यादा ४०, पुढे गतीरोधक आहे, शांतता क्षेत्र असे शहरात असलले एक ना अनेक वाहतूक नियमांचे फलक दोन दशकापासून गायब झालेले आहेत. वाहतूक शाखेला याचे कुठले घेणेदेणे नाही महापालिकेला याचे कुठले सोयरसुतक. या दोघांच्या दुर्लक्षामुळे शहर स्मार्ट होत असले तरी या स्मार्ट शहरातील वाहतूक मात्र जीवघेणी ठरत आहे. स्मार्टसिटी योजनेअंतर्गत लाखो रुपयांच्या होणाऱ्या खर्चात या वाहतूक नियमांच्या फलकासाठी हजारो रुपयांचा खर्च केल्यास शहराला खरे स्मार्टपण येणार आहे.