आयफोन 17 आज येणार, चार नव्या फोनसोबत स्मार्टवॉचही येणार

अॅपलचा बहुचर्चित एवे ड्रॉपिंग इव्हेंट उद्या, 9 सप्टेंबरला होणार आहे. हिंदुस्थानी वेळेनुसार हा इव्हेंट रात्री साडेदहाच्या सुमारास सुरू होईल. हा इव्हेंट अॅपल पोर्टल, यूटय़ूब आणि अॅपलच्या अधिकृत सोशल मीडियावरून लाईव्ह पाहता येईल. या इव्हेंटमध्ये आयफोन 17 सीरिजचे चार मॉडल आयफोन 17, आयफोन 17 एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स हे चार आयफोन लाँच केले जातील. या इव्हेंटमध्ये अॅपल कंपनी आपली स्मार्टवॉचची सीरिजसुद्धा लाँच करण्याची तयारी करत आहे. ज्यात अॅपल वॉच अल्ट्रा 3, अॅपल वॉच सीरिज 11 आणि एक नवीन वॉच एसई यांचा समावेश आहे. वॉच अल्ट्राच्या नवीन मॉडल्समध्ये काही मोठे अपग्रेड मिळण्याची शक्यता आहे. यात एक मोठय़ा स्क्रीनचाही समावेश आहे. कंपनीच्या नव्या एअरपॉड्स प्रो 3 लासुद्धा या इव्हेंटमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी लाँच केलेल्या अॅपल वॉच अल्ट्राला अपडेट केले नसल्यामुळे या वर्षी या वॉचला अपग्रेड केले जाण्याची शक्यता आहे. या नव्या स्मार्टवॉचमध्ये मोठी स्क्रीन मिळू शकते. आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स या फोनमध्ये चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.