
जयपूरमधील दोन खासगी शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. शाळेच्या ई-मेलवर हा धमकीचा मेल आला आहे. यानंतर शाळेच्या प्रशासनाने तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ स्क्वॉड आणि डॉग स्कॉड पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली, परंतु शाळेत शोधमोहीम हाती घेतल्यानंतर या ठिकाणी कोणतीही संशयित वस्तू सापडली नाही. यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.