
भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2025 मधील बँकांच्या सुट्टय़ांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार 12 सप्टेंबरला जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत. या ठिकाणी ईद-ए-मिलाद-उल-नबीनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 13 सप्टेंबरला दुसरा शनिवार असल्याने देशातील बँका बंद राहणार आहेत, तर 14 सप्टेंबरला रविवार असल्याने सर्व बँका बंद राहणार आहेत.