आयटीआरसाठी उरले फक्त सात दिवस

इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करण्यासाठी आता केवळ 7 दिवस उरले आहेत. करदात्यांना 15 सप्टेंबर 2025 पर्यंत आयटीआर फाईल करता येईल. देशभरात आतापर्यंत 4.66 कोटींहून अधिक करदात्यांनी आयटीआर फाईल केली आहे. यात एकूण 3.23 कोटी रिटर्न प्रोसेसमध्ये आहे. 12 ते 15 सप्टेंबर या काळात आयटीआर करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्याआधीच आयटीआर फाईल करावे, असे आवाहन टॅक्स तज्ञांकडून करण्यात आले आहे.