
राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाडण्यासाठी शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त जनआक्रोश मोर्चाला नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे. हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर या मोर्चात सहभागी झाले आहेत.
शिवसेना-मनसेच्या संयुक्त जनआक्रोश मोर्चात संजय राऊत सहभागी@rautsanjay61 @ShivSenaUBT_ pic.twitter.com/3Hk7Khp5Qs
— Saamana Online (@SaamanaOnline) September 12, 2025
हा मोर्चा बी. डी. भालेकर मैदानावरून सुरु झाला आहे. गंजमाळ सिग्नल, दूध बाजार, संत गाडगे महाराज पुतळा, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, महात्मा गांधी रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा विराट मोर्चा धडकणार आहे.
नाशिकमध्ये शिवसेना-मनसेच्या संयुक्त जनआक्रोश मोर्चाचे तुफान, मोर्चाला बी. डी. भालेकर मैदानावरून सुरुवात#nashik pic.twitter.com/rQnDfm9dPL
— Saamana Online (@SaamanaOnline) September 12, 2025