ओबीसी आरक्षण गेल्याने लातुरात तरुणाची आत्महत्या

ओबीसी आरक्षण गेल्याच्या धक्क्याने रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथे भरत महादेव कराड यांनी मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली. रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड हा ओबीसी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता होता. शासनाने मराठय़ांना ओबीसीमधून आरक्षण दिले. त्यामुळे ओबीसींना आता काही मिळणार नाही, असे तो म्हणत होता. गुरुवारी त्याने मांजरा नदीत उडी टाकली आणि आत्महत्या केली.