मणिपूरच्या नावातच ‘मणि’ आहे! 3 वर्षांपासून धगधगणाऱ्या मणिपूरमध्ये पहिल्यांदाच पोहोचले मोदी, म्हणाले…

गेल्या तीन वर्षांपासून जातीय हिंसाचारात धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये जायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर वेळ मिळाला. 13 सप्टेंबरच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी मणिपूरला पोहोचले. हिंसाचारग्रस्त चुराचांदपूर येथे मोदींनी मणिपुरी नागरिकांना संबोधित केले. मणिपूरच्या नावातच मणि असून हा मणि आगामी काळात उत्तर-पूर्व हिंदुस्थानची चमक वाढवणार, असल्याचे मोदी म्हणाले. भरपावसात या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांपुढे मोदी नतमस्तकही झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 7000 कोटी रुपायंच्या विकास कामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी संबोधित करताना मोदी म्हणाले की, मणिपूरची भूमी धाडस आणि शौर्याची भूमिका आहे. मी मणिपूरकरांच्या इच्छाशक्तीला सलाम करतो. पाऊस कोसळत असतानाही आपण सर्व जण इथे आलात. मी तुमच्यापुढे नतमस्तक होतो.