एक्सएआयने 500 कर्मचाऱ्यांना काढले

एलॉन मस्क यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) कंपनी एक्सएआयने आपल्या डेटा एनोटेशन टीममधून 500 कर्मचाऱयांना अचानक तडकाफडकी काढून टाकल्याने एकच खळबळ उडाली. ही कंपनी चॅटबॉट ग्रोकला प्रशिक्षण देण्याचे काम करत होती. एक्सएआयने कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून काढून टाकल्याची माहिती दिली. कंपनीचा फोकस आता जनरल एआय टय़ूटरवरून स्पेशालिस्ट एआयवर असेल, सांगितले. त्यामुळे कंपनी आता तज्ञांशी जोडली जाणार आहे. जे सायन्स, टेक्नालॉजी, इंजिनीअर, गणित, फायनान्स, मेडिसन आणि सेफ्टीमध्ये कार्यरत आहेत. एक्सएआयच्या डेटा एनोटेशन टीमला कंपनीची सर्वात मोठी युनिट मानले जात होते. याआधी टीममध्ये 1500 हून जास्त कर्मचारी काम करत होते.