शिवसैनिकांसाठी हक्काचा वकील असावा!

शिव विधी व न्याय सेनेचे पदाधिकारी, सदस्य व वकिलांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. शिवसैनिकांसाठी हक्काचा वकील असावा. त्यासाठी तुमच्यासारख्या वकिलांची गरज आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘माझ्या तळागाळातल्या शिवसैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हक्काचा वकील उपलब्ध असावा. पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना त्वरित कायदेशीर पाठिंबा मिळायला हवा. त्यासाठी तुमच्यासारख्या वकिलांची नितांत गरज आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘संघटना वाढीसाठी पक्ष तुम्हाला आवश्यक मदत करेल’, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला अॅड. कोजल कदम, अॅड. मेघा पडवळ, अॅड. विकास गोरडे, अॅड. रुता कोळी, अॅड. सचिन चिंदरकर, अॅड. सोनाली मयेकर, अॅड. सुषमा थोरात, अॅड. वर्षा जगताप, अॅड. विजय दळवी, अॅड. सोपान बुलबुले, अॅड. अनिरुद्ध मोरे, अॅड. नीलेश शिर्पे, अॅड. शबनम शेख, अॅड. भक्ती दांडेकर यांच्यासह मोठय़ा संख्येने वकील उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांचे शिव विधी व न्याय सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिव विधी व न्याय सेनेच्या पदाधिकाऱयांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते-आमदार अनिल परब, संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अॅड. नितीश सोनवणे, उपाध्यक्ष अॅड. सुरेखा गायकवाड, सरचिटणीस अॅड. मनोज कोंडेकर, चिटणीस अॅड. सुमीत घाग, मीडिया समन्वयक अॅड. दर्शना जोगदनकर, राज्य सदस्य अॅड. गिरीश दिवाण, अॅड. विकास डोंगरे उपस्थित होते.