महापालिकांमधील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून फडणवीस आणि शिंदेंमध्ये राजकीय तणातणी

राज्यातल्या सर्वच छोटय़ा महानगरपालिकांमध्ये सनदी अधिकाऱयांच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय तणातणी निर्माण झाल्याचे वृत्त आहे. छोटय़ा महानगरपालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्त करण्यासाठी फडणवीस आग्रही आहेत, पण या निर्णयाला एकनाथ शिंदे यांनी विरोध केला आहे.

राज्यातल्या ‘अ’ वर्ग म्हणजे मोठय़ा महानगरपालिकांमध्ये सनदी अधिकाऱयांची नियुक्ती होते त्याच धर्तीवर ‘ड’ वर्ग म्हणजे लहान महापालिकांमध्ये सनदी अधिकाऱयांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पण राज्य सरकारच्या सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱयांची नियुक्ती करण्याची पद्धत कायम ठेवण्याचा एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्यातील बेवनाव यानिमित्ताने पुढे आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय

सर्व महापालिकांमध्ये फक्त आयएएस अधिकारी असतील असे पुठेही ठरलेले नाही, मात्र ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या जागा आहेत त्या ठिकाणी सनदी अधिकारी नेमला नाही तर तुमच्याकडच्या सनदी अधिकाऱयांच्या जागा कमी करण्यात येऊ नये अशी विचारणा पेंद्र सरकार करते. त्यामुळे अशा नोटिफाईड ठिकाणी आयएएस अधिकारीच नियुक्त करण्यात आले पाहिजे असा आमचा आग्रह आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर त्यांची भूमिका उघड केली नाही, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवारांचे स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस सर्वांना सोबत घेऊन काम करतात. आमच्यात शीतयुद्ध नाही. फडणवीस यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. लोकाभिमुख कारभार करण्याचा आमचा तिघांचा प्रयत्न असतो. मी एकनाथ शिंदे यांचाही कार्यकाळ पाहिला आहे. त्यामुळे कारभार लोकाभिमुख व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.