दिव्यात चाळीच्या गॅलरीचा भाग कोसळला; 10 जणांची सुखरुपपणे सुटका..

ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या दिवा परिसरामध्ये एन. आर. नगर मधील संजय म्हात्रे चाळीचा पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे स्लॅब कोसळल्याने, तीन घरांमधील १० नागरिक अडकले होते. झालेल्या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिका प्रशासनाने इमारतीमधील ३० सदनिका या रिकाम्या केलेल्या आहेत.

ही एक मजली चाळ 15 ते 20 वर्षे जुनी असल्याची माहिती मिळत आहे. रविवार, १४ सप्टेंबर रोजी रात्री १०.२९ वाजताच्या सुमारास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला होता. दुर्घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दलाचे जवान, टोरंट पॉवरचे कर्मचारी घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले.

घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने बचावकार्य सुरु केले. अडकलेल्या 10 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्या त्यांना यश आले.