
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष्य अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जोपर्यंत भाजप सत्तेतून हटत नाही, तोपर्यंत देशात महागाईवर नियंत्रण येणार नाही. रोजगाराच्या संधी निर्माण होणार नाहीत आणि कायदा व सुव्यवस्थाही लागू होणार नाही.” माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
बिहारमधील एसआयआरवर बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, निवडणूक आयोगाला मतदार यादीतील त्रुटी सुधारण्याचे निर्देश सुप्रीम कोर्ट देईल, अशी त्यांना आशा आहे. त्यांनी पुढे म्हटले की, ज्या मतदारांची नावे यादीत समाविष्ट होणे बाकी आहे, ती सर्व नावे योग्यरित्या नोंदवली जातील. “आम्हाला विश्वास आहे की आम्हाला आशा आहे की सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी दुरुस्त करून घेईल,” असे त्यांनी नमूद केले.
#WATCH लखनऊ: SIR पर समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव ने कहा, “…हमें उम्मीद है कि सुप्रीम कोर्ट वोटर लिस्ट को चुनाव आयोग से ठीक कराएंगे और जो वोट बनना है, वो पूरा बनकर वोटर लिस्ट में शामिल होगा…”
उन्होंने आगे कहा, “भाजपा जब हटेगी तभी महंगाई पर नियंत्रण होगा। भाजपा जाएगी तभी… pic.twitter.com/nUexLZNljF
— ANI_HindiNews (@AHindinews) September 15, 2025