
बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक प्रवासी एअरपोर्टवर 15 मिनिटे आधी पोहोचला. यावरून इंडिगोच्या महिला कर्मचाऱ्याने या प्रवाशाला चांगलेच फटकारले. इंडिगो कर्मचाऱ्याकडून वाईट वागणूक मिळाली आहे, असे सांगत या प्रवाशाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. विमान उड्डाणाच्या 15 मिनिटे आधी हा व्यक्ती बोर्डिंग गेटवर पोहोचला होता, परंतु कर्मचाऱ्याने त्याला फ्लाईटमध्ये चढू दिले नाही. इंडिगो एअरलाइन्सच्या पॉलिसीनुसार, उड्डाणाच्या 25 मिनिटे आधीपर्यंत प्रवाशांना एन्ट्री दिली जाते. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. केम्पेगौडा एअरपोर्टच्या 15 आणि 16 वर अशा घटना नेहमीच होतात, असे नेटिजन्सने म्हटले. आतापर्यंत इंडिगो एअरलाइन्सकडून या व्हायरल व्हिडीओवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.