जरांगे यांचा आता ‘चलो दिल्ली’चा नारा

मराठय़ांना ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मुंबईत धडक दिल्यानंतर मराठा समाजाने पुढचे पाऊल टाकले आहे. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी ‘चलो दिल्ली’ असा नारा दिला आहे. राजधानी दिल्लीत देशभरातील मराठा समाजाचे अधिवेशन होणार असून त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

धाराशीव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 151 फूट उंचीचा स्वराज्य ध्वज उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन जरांगे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जरांगे यांनी पुढील दिशा स्पष्ट केली.