चेरपोलीतील शेकडो तरुण शिवसेनेत; शहापुरात शिवसेना अधिक मजबूत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाने प्रभावित झालेल्या चेरपोली येथील शेकडो तरुणांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, तालुकाप्रमुख कुलदीप धानके यांनी या तरुणांना शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. येत्या काही दिवसांत शिवसेनेत आणखी मोठे प्रवेश होणार असल्याचे सांगतानाच कुलदीप धानके यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवाच फडकेल, असा विश्वास व्यक्त केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहापूर तालुका कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. यावेळी चेरपोली साईनगर येतील राजेश पाटील, मंगेश जाधव, बाळा भोईर, संतोष पाटील, वैभव भगत, नीलेश कासार, प्रवीण पांढरे, योगेश बोटनर, चिंतामण खंजोडे यांच्यासह शेकडो तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, सचिव, शाखा समन्वयक अशा विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, तालुकाप्रमुख बाळा धानके, उपतालुकाप्रमुख व उपसरपंच सुनिल भेरे, स्वप्नील भेरे, सचिव रवींद्र लकडे, तालुका विस्तारक गणेश अवसरे, शहापूर शहरप्रमुख विजय देशमुख, बाळा निमसे, शरद मोगरे, संतोष अधिकारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.